| मुंबई | प्रतिनिधी |
वज्रमूठ सभेनंतर महाविकास आघाडी आता मुंबईत वज्रमूठ आवळणार आहे. मुंबईत महाविकास आघाडीकडून 11 एप्रिलला मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे अशोक चव्हाण, शेकापचे आ. जयंत पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेनेचे विनायक राऊत आदी नेतेमंडळी उपस्थित होती.
येत्या 11 एप्रिलला माहीम ते चैत्यभूमी परिसर असा मशाल मोर्चा काढण्याचे निश्चित करण्यात आले. या मोर्चात महाविकास आघाडीचे सर्व बडे नेते उपस्थित राहणार आहेत. त्यासंदर्भातील अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली.
पटोलेंचा स्वभाव अडचणीचा
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वभावामुळे महाविकास आघाडीमध्ये अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत पटोलेंच्या स्वभावावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाविकास आघाडीमध्ये थोरात अशोक चव्हाण योग्य समन्वय साधतात. नानांच्या स्वभावामुळे थोडी अडचण होते, असे राष्ट्रवादीच्या नेत्यांचे मत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.