मायनाक भंडारी पहीला आरमार शौर्य दिन साजरा

| मुरूड । वार्ताहर ।
शिवछत्रपतींच्या स्वराज्य आरमारातील पहिले आरमार प्रमुख असणार्‍या शूरवीर मायनाक भंडारी आणि त्यांच्या शिलेदारांच्या शौर्य, कर्तृत्व, पराक्रमाचे स्मरण करण्यासाठीं (19) सप्टेंबर रोजी भंडारी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने साजरा करण्यात आला. यावेळी दर्शन पारकर, अक्षय गुळेकर, अश्‍विनकुमार पाटील, विलास आंब्रे, प्रशांत चिंबुलकर, सचिन कदम उपस्थित होते.

छत्रपती शिवरायांनी समुद्रमार्गे येणार्‍या परकीय क्षत्रुंचा धोका ओळखून इ.स 1658 साली स्वराज्य आरमाराची मुहूर्तमेढ रोवली. जंजिरेकर सिद्धी, रेवदंड्याचे पोर्तुगीज, डच, मुंबईकर इंग्रज ह्या परकीय क्षत्रुंपासून असणारा धोका ओळखून मुंबईपासून जवळच असलेल्या खांदेरी बेटावर किल्ला उभारण्याचे ठरवले व तो उभारण्याची जबाबदारी दर्याविर मायनाक भंडारी यांच्यावर सोपवली. मायनाकांनी आपल्या कडव्या शिलेदारांच्या साहाय्याने ती जबाबदारी स्विकारून दिवसा युद्ध आणि रात्रीत किल्ल्याचे बांधकाम अशा रीतीने किल्ला उभारून स्वराज्य आरमाराचे ठाणे निर्माण केलें.

इंग्रजांना आपल्या सागरी सामर्थ्याचा विलक्षण अभिमान होता, इंग्रजांना सागरपुत्र म्हणत परंतु भारतात शिवआरमार विस्तार करत असताना अगदी सुरुवातीलाच मायनाक नामक एका सागरी योद्ध्याने इंग्रजांचा *पहिला आरमारी पराभव करून सागरपुत्र हि त्यांची पदवी मोडीत काढली 400 वर्षाची नाविक परंपरा असलेल्या आणि तोवर नाविक युध्दात अपराजित असलेल्या ज्यांनी पुढे सव्वाशे वर्षे भारतावर सार्वभौम सत्ता गाजवली त्या इंग्रजांचा पहिला आरमारी पराभव 19 सप्टेंबर 1679 रोजी आरमार प्रमुख मायनाक भंडारी यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली खांदेरी किल्ल्यावरील युद्धादरम्यान करून असामान्य असा पराक्रम केला होता. त्यामुळे या दिवशी मायनाक भंडारी यांनी केलेल्या या पहिल्या आरमार शौर्य दिन भंडारी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने साजरा करण्यात आला.

Exit mobile version