| रसायनी | वार्ताहर |
रसायनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आपटा या ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी असणारे वृषभ धुमाळ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर उपसरपंच पद रिक्त झाले होते. या उपसरपंच पदाची निवडणूक आपटा ग्रामपंचायतीच्या कार्यालयात पार पडली. यावेळी उपसरपंच पदासाठी शेकापचे मयुर शेलार यांनी अर्ज दाखल केला होता. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामसेवक नवनाथ शेंडगे यांनी काम पाहिले. तर, उपसरपंचपदाची निवडणूक सरपंच निकीता भोईर यांच्या उपस्थितीत पार पडली. उपसरपंचपदी मयूर शेलार यांची निवड होताच कार्यालयाबाहेर मयूर शेलार यांच्या चाहत्यांनी आनंदोत्सव साजरा केला. दरम्यान, आपटा ग्रामपंचायतीच्या सरपंच निकीता भोईर यांनीही राजीनामा दिल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.