एमसीएच्या नव्या लोगोचे अनावरण

। रायगड । क्रीडा प्रतिनिधी ।

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या नव्या कार्यालयाचे व लोगोचे अनावरण सोमवारी (दि.12) पुणे येथील मोदीबाग येथे आयसीसी व बीसीसीआयचे माजी अध्यक्ष माजी केंद्रिय मंत्री शरद पवार, बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलार, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार व अ‍ॅपेक्स बॉडी सदस्यांच्या हस्ते पार पडले.

यावेळी माजी क्रिकेटर चंदू बोर्डे, आंतरराष्ट्रीय क्रिकेटर ऋतूराज गायकवाड, महाराष्ट्राचे आजी-माजी क्रिकेटपटू तसेच एमसीएचे आजी-माजी पदाधिकारी, रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष अनिरुद्ध पाटील यांच्यासह महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अधिकार क्षेत्रात येणार्‍या 21 जिल्ह्यांचे व विविध क्लबचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

या कार्यक्रमाप्रसंगी आरडीसीएचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील यांनी एमसीए अध्यक्ष रोहित पवार यांची भेट घेऊन त्यांना रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या कामाची माहिती दिली. आपण लवकरच रायगड जिल्ह्याचा दौरा करणार असून येणार्‍या क्रिकेट हंगामात एमसीएच्या विविध वयोगटातील आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेतील काही सामने रायगड जिल्ह्यात देण्याचे आश्‍वासन रोहित पवार यांनी दिले व आरडीसीएला एमसीएकडून सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

Exit mobile version