। मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबईतील गोरेगावमध्ये ड्रग्ज विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा ड्रग्ज तस्करांना मुंबई गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली. त्या दोघांकडे एक कोटी रुपये किमतीचा 427 ग्रॅम एमडी साठा मिळून आला. गोरेगाव परिसरात दोन ड्रग्ज तस्कर एमडीचा साठा घेऊन विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती अमली पदार्थविरोधी कक्षाच्या कांदिवली युनिटला मिळाली. त्यानुसार पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून त्या दोघा ड्रग्ज तस्करांना पकडले. दोघांच्या अंगझडतीत 427 ग्रॅम वजनाचा एमडी साठा मिळाला. जवळपास एक कोटी सहा लाख रुपये किमतीचा हा एमडी असल्याने ड्रग्ज तस्करांना चांगलाच दणका बसला आहे.







