| नवी मुंबई | वृत्तसंस्था |
नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने वाशीत दोन जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 24 लाख 20 हजार रुपयांचा एमडी (मेफेड्रॉन) हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. सलाम इस्लाम खान (45) आणि मोहसीन अस्लम खान (37) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. वाशी सेक्टर 17 येथील चौकातून पाम बीचकडे जाणार्या मार्गावर पोलीसांनी कारवाई केली.