‘रोटी घर’च्या माध्यमातून गोरगरीबांना पोटभर जेवण

। उरण । वार्ताहर ।
कोरोनाच्या काळात अनेकांना भुकेने जीव गमवावा लागला आहे. कोणीही उपाशी राहू नये, यासाठी रोटी घरने पुढाकार घेतला आहे. उरणमधील गोरगरीबांना पोटभर जेवण मिळावे यासाठी ‘रोटी घर’च्या मदतीचा हात दिला आहे.

या उपक्रमासाठी सेव अवर बीचचे अमोल दुरुगकर, स्वाती दुरुगकर, भूमिका सिंग हे प्रयत्नशील होते. खुशिया फाऊंडेशचे अध्यक्ष चिनू क्वात्रा हे उरण पिरवाडी बिचवर साफसफाई करण्यासाठी आले असता अमोल दुरुगकर, स्वाती दुरुगकर, भूमिका सिंग, विठ्ठल ममताबादे यांनी उरणमध्ये गरीब कुटुंबातील लहान बालकांना मोफत जेवण मिळावे, अशी संकल्पना त्यांच्यासमोर मांडली. लगेच त्यांनी या संकल्पनेला होकार दिला. आज ही संकल्पना उरणमध्ये प्रत्यक्षात उतरली आहे.

गरीब व गरजू मुलांना पोटभर जेवण मिळावे या दृष्टीकोनाातून उरण शहरात गरीब मुलांना दररोज अन्नदान केले जात आहे. सेव अवर बीच, वुमन ऑफ विसडमच्या सदस्या भूमिका सिंग आणि मुंबईचे समाजसेवक चिनू क्वात्रा यांच्या खुशियाँ फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उरणमध्ये रोटी घर ही संकल्पना जुलै महिन्यापासून सुरु झाली आहे. यामध्ये गरीब मुलांना मोफत जेवण दिले जाते. रोटी घर या संकल्पनेची सुरुवात दि 1 जुलै 2021 पासून सुरु झाली आहे. तरी यामध्ये जेवण वाढण्यासाठी आणि जेवण पोहचविण्यास काही स्वयंसेवकांची मदतीची गरज आहे. तरी कोणाला मनापासून, स्वेच्छेने मदत करायची असल्यास त्यांनी भूमिका सिंग 9867577669 वर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version