कायदा सुव्यवस्थेसाठी उपाययोजना

| पनवेल | वार्ताहर |

खारघर वसाहती मधील कायदा व सुरक्षा अबाधित राहण्यासाठी विशेष उपाययोजना करणार असल्याचे प्रतिपादन खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव शेजवळ यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या तर्फे केलेल्या सत्काराला उत्तर देताना केले.

खारघर पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव शेजवळ यांचे गुरुनाथ पाटील यांच्यासह शिवसेना पदाधिकार्‍यांनी सदिच्छा भेट घेऊन त्यांचा विशेष सत्कार केला. या वेळी संजय शिंदे, अनिल तळवणेकर, प्रशांत देवरुखकर, संजय कानडे आनंद वावळ, जाधव आणि इतर शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना वोपोनि राजीव शेजवळ यांनी सांगितले की, पोलीस ठाण्यात येणार्‍या तक्रार दारांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी विशेष उपाययोजना करणार तसेच महिलानांच्या तक्रारींसाठी महिला सहायता कक्ष सुरू करण्यात आले आहे. यामध्ये महिलांनी निसंकोचपणे येऊन आपली तक्रार द्यावी तसेच वाढत्या गुन्हेगारीचे बिमोड करण्यासाठी विशेष उपाययोजना करणार असल्याची ग्वाही सुद्धा त्यांनी दिली.

Exit mobile version