नागरिकांना सुरक्षित स्थळी हळविले, सहकार्य करण्याचे आवाहन
। खेड। प्रतिनिधी ।
पणदेरी लघुपाटबंधारे प्रकल्प ता. मंडणगड जि. रत्नागिरी योजनेतंर्गत पणदेरी धरण सन 1995-96 मध्ये पूर्ण करण्यात आले आहे. 05 जुलै रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास धरणातून गळती होत असल्याचे निर्दशनास आल्यानंतर रत्नागिरी पाटबंधारे विभागाकडून गळती थांबविण्यासाठी तात्काळ उपाययोजना हाती घेण्यात आल्या. यामध्ये मातीचा भराव करुन गळती थांबविण्याचे काम सुरु आहे. धरणफुटीचा धोका टाळण्यासाठी सांडवा मोकळा करुन धरणातील पाण्याची पातळी कमी करण्याची कार्यवाही सुरु आहे. त्यामुळे सद्यस्थितीत धरण फुटण्याची शक्यता कमी झाली आहे.
धरणाच्या खालच्या बाजूस पणदेरी मोहल्ला, सुतारवाडी, पाटीलवाडी, कुंभारवाडी, रोहीदासवाडी व बौध्दवाडी येथे लोकवस्ती असून सदर वाडी व गावातील लोकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच जिवीतहानी टाळण्याच्या दृष्टीने रोहीदासवाडी व बौध्दवाडी येथील सुमारे 200 ग्रामस्थांना त्यांच्या मौल्यवान वस्तूंसह सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे. त्यांच्या भोजनाची व निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून धरणाच्या ठिकाणी स्वयंसेवकांच्या मदतीने बचावपथक कार्यरत आहे. त्याशिवाय म्ब्युलन्ससह आरोग्यपथक, पुरेसा पोलीस बंदोबस्त व एनडीफचे पथक घटनास्थळी तैनात करण्यात आले आहे. सद्यस्थितीत जिवीतहानी टाळण्याच्या दृष्टीने सर्व उपाययोजना करण्यात येत असून कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.
धरण सुरक्षिततेच्या बाबतीत वरा ीरषशीूं ेीसरपळूरींळेप चे कार्यकारी अभियंता यांनी धरणास भेट दिली असून धरण सुरक्षित असल्याचा निष्कर्ष नोंदविला आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी तथापि घाबरुन जाण्याचे कारण नाही तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होत असल्याची शक्यता निर्दशनास आल्यास तहसिलदार मंडणगड, गटविकास अधिकारी मंडणगड, पोलीस निरीक्षक मंडणगड यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले आहे.