‘नेमबाज संघाकडून पदकाच्या आशा’

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

पॅरिस ऑलिंपिक स्पर्धा तोंडावर आलेली असताना राष्ट्रीय रायफल संघटनेने 21 नेमबाजांचा संघ जाहीर केला. हा संघ अगोदर जाहीर करता आला असता तर खेळाडूंना तयारीसाठी अधिक वेळ मिळाला असता, असे असले तरी भारताच्या या जम्बो नेमबाज संघाकडून पदकाच्या आशा आहेत, असाही विश्‍वास सोधीने व्यक्त केला आहे.

ऑलिंपिकच्या इतिहासात प्रथमच अधिक नेमबाजांचा संघ पॅरिसमध्ये खेळणार आहे. 2021 मध्ये झालेल्या टोकिया ऑलिंपिक स्पर्धेत 15 नेमबाजांचा संघ सहभागी झाला होता; परंतु एकही पदक मिळाले नव्हते. त्या अगोदरच्या ऑलिंपिक स्पर्धेतही नेमबाजांची पाटी कोरी राहिली होती. या पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत भारताचे 21 नेमबाज स्पर्धा करणार आहेत. भारताच्या नेमबाजीच्या इतिहासात हा सर्वात मोठा संघ आहे. त्यांच्याकडून पदकाची अपेक्षा आहे; परंतु नेमबाजी हा असा खेळ आहे त्याचे भाकीत कोणीच करू शकत नसल्याचे रंजन सोधी यांचे मत आहे.

Exit mobile version