• Login
Thursday, February 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

महाराष्ट्र संघाकडून पदकांचा वर्षाव

Krushival by Krushival
January 24, 2024
in क्रीडा, चेन्नई
0 0
0
महाराष्ट्र संघाकडून पदकांचा वर्षाव
0
SHARES
12
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| चेन्नई | वृत्तसंस्था |

महाराष्ट्राच्या खेळाडूंनी स्पर्धेचा आजचा पाचवा दिवस पदकांच्या वर्षावाने गाजविला. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी दिवसभरात जिम्नॅस्टिक्स, मल्लखांब, योगासने, सायकलिंग, स्क्वॉश या खेळांमध्ये तब्बल 10 सुवर्ण, 5 रौप्य तर 2 कांस्य असे एकून 17 पदकांची कमाई केली. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी मुलींच्या रिदमिक जिम्नॅस्टिक्स या क्रीडा प्रकारात आपले वर्चस्व कायम राखताना आज आपल्या खात्यात आणखी तीन सुवर्णपदकांची भर घातली. त्याचे श्रेय दोन सुवर्णपदक जिंकणार्‍या संयुक्ता काळे व एक सुवर्णपदक जिंकणार्‍या किमया कारले यांना द्यावे लागेल.

महाराष्ट्राची सुवर्णकन्या म्हणून ख्याती मिळवलेल्या संयुक्ता हिने आज बॉल व रिबन या प्रकारात सुवर्णपदक जिंकले. या दोन्ही क्रीडा प्रकारांमध्ये तिने अतिशय नेत्र दीपक कौशल्य दाखविले. हूप या प्रकारात तिला रुपेरी कामगिरीवर समाधान मानावे लागले. संयुक्ता हिने काल वैयक्तिक सर्वसाधारण प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते.

किमया हिने हूप या प्रकारात सुवर्णपदक जिंकले. आजपर्यंत तिने राज्य व राष्ट्रीय स्तरावर सव्वाशेहून अधिक पदकांची कमाई केली आहे. तिने आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतील बॉल या प्रकारात 26.30 गुणांची नोंद करीत या स्पर्धेत सर्वाधिक गुण नोंदवणारी भारतीय खेळाडू होण्याचा मान मिळाला होता. आजपर्यंत तिने आंतरराष्ट्रीय निमंत्रित स्पर्धेत एका सुवर्णपदकासह अकरा पदके जिंकली आहेत. ती बारावीत शिकत असून तिला क्रीडाशास्त्र अभ्यासक्रमात पदवी घ्यायची आहे. किमया व संयुक्ता या दोन्ही खेळाडू ठाणे येथे फिनिक्स अकादमीत पूजा व मानसी सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात.महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार्‍या मुंबईच्या परीना मदनपोत्रा हिने क्लब्ज या प्रकारात रौप्य पदकाची कमाई करीत महाराष्ट्राच्या खात्यामध्ये आणखी एका पदकाची भर घातली.

मल्लखांबमध्येही महाराष्ट्राने वर्चस्व गाजवताना आज चार सुवर्णपदके जिंकून धमाका केला. महाराष्ट्राने मुलांच्या गटात 125.45 गुणांसह सांघिक सुवर्णपदक जिंकले. या संघामध्ये वेदांत शिंदे, रणवीर मोहिते, शार्दुल ऋषिकेश, निशांत लोखंडे, मृगांक पाथरे, आयुष कलंगे यांचा समावेश होता. मुलींच्या गटात महाराष्ट्रालाच सांघिक सुवर्णपदक मिळाले. आर्या साळुंखे, भक्ती मोरे, प्रणाली मोरे, सई शिंदे, पलक चुरी व वैष्णवी पवार यांचा समावेश असलेल्या महाराष्ट्राने 83.80 गुणांची नोंद केली.

मुलांच्या विभागात महाराष्ट्राच्या शार्दुल ऋषिकेश यांनी वैयक्तिक सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. त्याने टांगता, पुरलेला व दोरीचा मल्लखांब या तिन्ही प्रकारात अप्रतिम कौशल्य दाखवीत हे यश संपादन केले. त्याला 25.45 गुण मिळाले. तो चेंबूर येथील जवाहर विद्या भवन केंद्रात सुनील गंगावणे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. मुलींच्या वैयक्तिक सर्वसाधारण गटात महाराष्ट्राच्या प्रणाली मोरे व पलक चुरी यांनी अनुक्रमे सुवर्णपदक व रौप्य पदक जिंकले. प्रणाली हिने 16.95 गुणांची नोंद केली तर पलक हिला 16.90 गुण मिळाले.

चेन्नईतील तामिळनाडू क्रीडा विद्यापीठातील तलवारबाजीत पदकाची घोडदौड सुरू ठेवत महाराष्ट्राच्या मुलींनी सांघिक गटात सुवर्ण पदकाचा करिश्मा घडविला. सेबर प्रकारात बलाढ्य हरियाणाला शेवटच्या टप्प्यात 45-43 गुणांनी नमवून महाराष्ट्राने सुवर्ण पदकाला गवसणी घातली. अनुभवी कशिष भराड, शर्वरी गोसेवाडे, श्रुतिका चव्हाण, हर्षदा वंजारे या संघाने महाराष्ट्रासाठी प्रथमच सुवर्ण पदक कमावले. आंतरराष्ट्रीय खेळाडू हिमांशी नेगी आक्रमक खेळाच्या जोरावर हरयाणा संघाने 35-31 गुणांची आघाडी घेतली होती. परंतू शर्वरीने तुफानी खेळाचे प्रदर्शन घडविताना सुवर्ण पदक खेचून आणले.

योगासनांच्या आर्टिस्टिक पेअर या प्रकारातील मुलांच्या गटात संगमनेर, अहमदनगरच्या यश लगड आणि प्रणव साहू या दोघांनी सुवर्ण, तर आर्यन खरात व तन्मय म्हाळसकर यांनी रौप्य पदक मिळविले. संगमनेर येथील ध्रुव ग्लोबल स्कूलचे विद्यार्थी असणारे चौघेही विष्णू चक्रवर्ती, प्रवीण पाटील व किरण वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली 7 ते 8 तास सराव करतात. पदक जिंकल्यानंतर बोलताना यश आणि प्रणव यांनी योगासानांमध्ये भारताला ऑलिम्पिक पदक मिळवून देणार असल्याचा विश्‍वास व्यक्त केला. मुलीच्या याच प्रकारात निरल वाडेकर व वैदेही मयेकर यांनी रजत कामगिरी केली. संगमनेर येथील ध्रुव ग्लोबल स्कूलमध्ये अनुक्रमे सहावी व सातवीमध्ये शिकत आहेत.

महाराष्ट्राच्या वेदांत जाधवने चेन्नईतील तामिळनाडू क्रीडा विद्यापीठच्या सायकल ट्रॅकवर वैयक्तिक 200 मीटर स्प्रींट प्रकारात सुवर्णपदकाची शर्यत जिंकली. पुण्याच्या वेदांत जाधवने केरळचा अनुभवी खेळाडू जोहानला मागे टाकून महाराष्ट्रासाठी सायकलिंगमधील पहिले सोनेरी यश संपादन केले. अंतिम फेरीत केरळकडून खेळणार्‍या अर्थव पाटीलला कडवी झुंज देत वेदांतने सुवर्ण पदकाचा करिश्मा घडविला. त्याने उपांत्य फेरीत अंदमान निकोबारच्या जोहनला सलग 2 शर्यतीमध्ये पराभूत करून महाराष्ट्राचे पदक निश्‍चित केले होते. पुण्यात प्रशिक्षक दर्शन बारगुजे व दिपाली पाटील यांचे मार्गदर्शनावाखाली तो सराव करतो.या प्रकारातील कांस्यपदक महाराष्ट्राच्या वेदांत ताजणे याने कमवले. नाशिकचा वेदांत ताजणे सध्या दिल्लीत खेलो इंडिया अकादमीत सराव करत असतो.

महाराष्ट्राच्या निरुपला दुबेने स्क्वॉशमध्ये रौप्य पदक मिळविले. निरूपमला तामिळनाडूच्या पूजा आरतीकडून 3-2 असा पराभव स्वीकारावा लागला. सलग तीन लढती जिंकून निरुपमाने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र अंतिम फेरीत तिने दिलेल्या झुंजीला यश मिळाले नाही.बास्केटबॉल मधील मुलींच्या गटात महाराष्ट्राला शेवटच्या साखळी लढतीत यजमान तामिळनाडूकडून 67-72 असा पराभव स्वीकारावा लागला. त्यावेळी तमिळनाडूकडून देसी अंथिया व आर.दीप्ती यांनी अनुक्रमे 16 व 17 गुण नोंदविले. महाराष्ट्राकडून अनया भावसार (20गुण) व शोमीरा बिडये (13)गुण यांची लढत अपुरी पडली. महाराष्ट्राने यापूर्वीच पहिले दोन सामने जिंकून उपांत्य फेरी निश्‍चित केली होती उपांत्य फेरीत त्यांचा पंजाबशी सामना होणार आहे.

Related

Tags: Athletes won goldchennaiindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newssocial media newssocial newssportssports indiaSPORTS MAHARASHTRAsports mumbaisports news
Previous Post

सुक्या मासळीला मोठी मागणी

Next Post

‘पैशाने तुटली नाती’ नाट्य प्रयोगाला प्रतिसाद

Krushival

Krushival

Related Posts

दक्षिण आफ्रिकेचा धमाकेदार विजय
क्रीडा

दक्षिण आफ्रिकेचा धमाकेदार विजय

February 10, 2026
डेव्हिस कपमध्ये भारताने नेदरलँड्सला हरवले
क्रीडा

डेव्हिस कपमध्ये भारताने नेदरलँड्सला हरवले

February 10, 2026
भारत-पाक सामन्याची आशा जिवंत
क्रीडा

भारत-पाक सामन्याची आशा जिवंत

February 9, 2026
कर्नाटकचा उपांत्य फेरीत प्रवेश
क्रीडा

कर्नाटकचा उपांत्य फेरीत प्रवेश

February 9, 2026
पॉवरलिफ्टिंगमध्ये रोनकला सुवर्णपदक
क्रीडा

पॉवरलिफ्टिंगमध्ये रोनकला सुवर्णपदक

February 9, 2026
भारत विश्वविजेता! अंडर-19 चा विश्वचषक सहाव्यांदा जिंकला
sliderhome

भारत विश्वविजेता! अंडर-19 चा विश्वचषक सहाव्यांदा जिंकला

February 6, 2026
Next Post
‘पैशाने तुटली नाती’ नाट्य प्रयोगाला प्रतिसाद

'पैशाने तुटली नाती' नाट्य प्रयोगाला प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?