| पनवेल | प्रतिनिधी |
नवीन पनवेल वाहतुक शाखेतर्फे हद्दीतील स्कूल बस चालक मालकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पोलीस उपआयुक्त वाहतुक नवी मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली नविन पनवेल वाहतुक शाखा येथील वपोनि प्रकाश सकपाळ यांचे विद्यमानाने लायन्स क्लब, पनवेल यांचे वतीने मेडिकव्हर टीम यांचेद्वारे नवीन पनवेल वाहतुक शाखा येथे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार तसेच नवीन पनवेल हद्दीतील स्कुल बस चालक, मालकांची वैद्यकीय तपासणी करून घेण्यात आली. स्कुल बस वरील चालक, मालक हे लहान मुलांना शळेत ने-आण करण्याचे काम करित असतात ते वैद्यकीयरित्या सक्षम असणे गरजेचे आहे. त्याकरिता त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. सदर वैद्यकीय तपासणीमध्ये उंची, वजन, रक्तदाब, शुगर, इसीजी, सीबीसी तपासणी, डोळे तपासणी यासह इतर प्रकारच्या तपासणी करण्यात आल्या. सदर वैद्यकीय तपासणीमध्ये नवीन पनवेल वाहतुक शाखेतील एकुण 20 पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच स्कुल बस चालक, मालक 35 यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. सदर कार्यक्रमात लायन्स क्लब पनवेलचे सुरभी पेणसे, ज्योती देशमाने तसेच मेडिकव्हर हॉस्पीटल, नवी मुंबई डॉ. साकेत जहा व टीम तसेच वपोनि प्रकाश सकपाळ, जितेंद्र कदम, ज्ञानेश्वर वाघ, किशोर लाड हे उपस्थित होते.







