। पेण । वार्ताहर ।
अंकुर ट्रस्ट व मैत्रेराज फाउंडेशन, व्हीआरवन याच्या संयुक्त विद्यमाने ब्रेक द चेन अभियानांंतर्गत बळवली या ग्रामपंचाय हद्दीतील या आदिवासीं वाड्यांवर तपासणी शिबीरे घेण्याचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला डॉ. देवल दोषी, संदीप दोषी, यश यांनी सहभाग घेतला.
बेलवडे बुद्रुक आणि बळवली या गावामध्ये मोठ्या संख्येने करोना ग्रस्त रुग्णाचा आकडा वाढताना दिसत आहे. सख्या आजुबाजूचा प्रसार बघायला मिळतो परंतु आदिवासी सरकारी दवाखान्यात येण्यास घाबरतात म्हणून डॉ. मैत्रेयी पाटील गेल्या काही दिवसांपासून नियमितपणे ग्रामीण भागात जाऊन प्रबोधन करीत आहेत.
अनामिक भितीमुळे आदिवासी सरकारी यंत्रणेला तपासणी करायला सातत्याने नकार देत आहे म्हणुन हा उपक्रम सुरू केला असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या डॉ.वैशाली पाटील यांना केले. डॉ. मैत्रेयी पाटील, डॉ. देवल दोशी यांनी नियमितपणे या दोन्ही ग्रामपंचायतील एकूण 16 वाड्यांना भेट देण्याचे आणि जनजागृती करण्याचे अभियान सुरू केले. बळवली आणि बेलवडे ग्रामपंचायतीमध्ये विविध वाड्यांतील एकूण 107 आदिवासी रुग्णांनी तपासणी करून घेतली. यामध्ये मोठ्या प्रमाणात वृद्ध व लहान मुलांना कोरोनाची लक्षणे दिसून आली. या वेळेस डॉ. मैत्रेय पाटील यांनी आदिवासींना कोरोनाची कल्पना देऊन यावर आपला बचाव कसा करायचा याचे मार्गदर्शन केले. यावेळी सुवर्णा पाटील, गार्गी पाटील, नर्सिंगचे प्रशिक्षक घेत असलेल्या भाग्यश्री निवलकर आणि अंबिका गावंड यांनी मदत करून औषध उपचार करण ही सुरू केला आहे.