एकपात्री अभिनय स्पर्धेत मीरा पाटील प्रथम

छोट्या गटात आर्या मोरे प्रथम
| रेवदंडा | प्रतिनिधी |
मोरया कला अ‍ॅकडमी आयोजीत जेष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांच्या स्मरणार्थ खुल्या स्पर्धात्मक एकपात्री अभिनय स्पर्धेत मोठा गटात प्रथम मिरा निनाद पाटील, व्दितीय स्नेहल महेंद्र गुरव, तृतीय अभिषेक प्रमोद पाटील उत्तेजनार्थ सुधीर सावंत व छोटया गटात प्रथम आर्या गणेश मोरे, व्दितीय आर्या विनोद नाईक, तृतीय कौस्तुभ पाटील, उत्तेजनार्थ ओवी शैलेश आगलावे, नव्या निलेश नाईक, अनन्या गणेश परभाळे यांनी सुयश मिळविले.

या स्पर्धेस जेष्ठ अभिनेते व दिग्दर्शक सतिश पुळेकर यांनी परिक्षक तर श्रध्दा सतिश पुळेकर व निलेश खोत यांनी सहपरिक्षक म्हणून काम पाहिले. या एकपात्री अभिनय स्पर्धेत लहान व मोठया गटात एकूण 34 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. तर मोठया संख्येने अभिनय रसिक प्रेक्षकांनी स्पर्धेत उपस्थिती ठेवून स्पर्धकांना प्रोत्साहन दिले.
या एकपात्री अभिनय स्पर्धेत जेष्ठ अभिनेते व दिग्दर्शक सतिश पुळेकर, श्रध्दा सतिश पुळेकर, मनिष अंसुरकर,या मान्यवर कलाकारासह राजिप विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, निवास केळकर, स्वर्गिय आशालता वाबगावकर यांची भाची मृगजताई, सुधाकर मेस्त्री, निलेश खोत व मोरया परिवार मान्यवर आदीची विशेष उपस्थिती होती. अंतिम विजेत्या स्पर्धकांना उपस्थित मान्यवरांचे हस्ते प्रमाणपत्र, व चषक प्रदान करण्यात आले. प्रास्ताविक प्रकाश कवळे, तर स्पर्धेचे सूत्रसंचलन अनिल म्हात्रे यांनी केले.

Exit mobile version