मीरा ठाकरेंचे प्रांत कार्यालसमोर उपोषण

| नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील वांजळे गावातील गावठाण लगत खासगी रस्ता बनविण्यात आले आहे. हा रस्ता हटविण्यात यावा या मागणीसाठी तेथील महिला कर्जत प्रांत कार्यालयाबाहेर उपोषणाला बसल्या आहेत.तालुक्यातील वांजळे खरेदीखत गावठाण जागेत मीरा कमलेश ठाकरे यांची जागा आहे . या जागेत 2013/14 मध्ये विशेष घटक या फंडातून सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता तयार केला. ठाकरे यांची हि खरेदी केलेली जागा असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने हा रस्ता कसा काय केला असा सवाल पंचायत समितीकडे ठाकरे यांनी पत्र व्यवहार करून केला. याबाबत अनेक वेळा पत्रव्यवहार केला,आंदोलन केले मात्र तरीही हा खासगी जागेतील रस्ता तेथून हटवित नसल्याने अखेर ठाकरे या महिलेने या विरोधात आज पर्यंत दोन वेळा उपोषण केले. मात्र मागणी मान्य होत नसल्याने आता तिसर्‍यादा बुधवार पासून प्रांत कार्यालयाच्या समोर मीरा ठाकरे यांनी उपोषण सुरु केले आहे.

Exit mobile version