। म्हसळा । वार्ताहर ।
रायगड जिल्ह्यात होणार्या आगामी रायगड जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायती व ग्रामपंचायती इत्यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याच्या हेतूने आज शनिवारी सकाळी 10 वाजता आगरी समाज हॉल येथे शेतकरी कामगार पक्ष कार्यकर्ता मेळावा आयोजीत केला आहे. या मेळाव्यात शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ.जयंत पाटील, माजी आ.पंडीत पाटील, जिल्हा चिटणीस आस्वाद पाटिल आणि इतर मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे.