| कोर्लई | प्रतिनिधी |
मुरुड तालुका कृषी विभाग, पाणी फाऊंडेशन आणि उमेद संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने फार्मर कप स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. गट बांधणी करीता मुरुड तालुका पंचायत समितीतील श्री नानासाहेब धर्माधिकारी सभागृहात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाणी फाऊंडेशनचे अनिकेत जगदाळे, निकीता मोकल, तालुका कृषी अधिकारी प्रमोद नरळे, सहाय्यक कृषी अधिकारी विशाल चौधरी, उमेद संस्थेकडून बी एम एम मॅडम, अनिल खापडे यांसह शेतकरी बांधव उपस्थित होते.
तालुका कृषी अधिकारी प्रमोद नरळे यांनी गट बांधणीसाठी संपूर्ण मदत करू तसेच यापुढे सर्व योजना गटांसाठी प्रथम प्राधान्य राहील तसेच बियाणे सुद्धा प्रथम गटाला प्राधान्य असेल आणि गट शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पादन नक्कीच वाढेल आणि मुरुड तालुक्यातील शेतीतील नैराश्य संपवण्यासाठी ही लोक चळवळ नक्कीच उपयोगी ठरेल, असे ते म्हणाले.
मुरुडमध्ये फार्मर कप स्पर्धा गट बांधणीसाठी सभा
