पोयनाड येथे बैठकीचे आयोजन

। भाकरवड । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील रा जि प शाळा पोयनाड येथे सक्षमीकरण अर्थात व्यावसायिक अध्ययन समूह बैठक गटशिक्षणाधिकारी श्री.पिंगळा, जिल्हा समन्वयक श्री. वीसे, तालुका संघटना अध्यक्ष श्री.भोपी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. विश्‍वजित म्हात्रे यांच्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनाने उपस्थित सहभागी सदस्यांना प्रशिक्षित केले. खउए इठए-घखछॠ ,सदस्यांची अभिव्यक्ती, कर्तव्य व जाबाबदारी, नियोजन, सनियंत्रण, व्यवस्थापन व लेखन कौशल्य यावर भर देत सुंदर चर्चा घडवून आणली. सदर प्रशिक्षणास 43 शिक्षणार्थी उपस्थित होते.

Exit mobile version