। पनवेल । प्रतिनिधी।
लोकसभा निवडणुकीच्या अगोदर आदरणीय शरदचंद्र पवार यांनी सांगितले होते लोकसभेला महाविकास आघाडीला 32 ते 35 जागा मिळतील आणि महाविकास आघाडीला 31 जागा मिळाल्या. या कोकण पदवीधर मतदार संघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर यांना विजयी करून कोकणावर लागलेला डाग पुसून काढण्याचा प्रयत्न करू या असे कोकण शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी सांगितले, ते काल 23 जून 2024 रोजी खारघर येथे आयोजित कोकण पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश किर यांच्या प्रचाराच्या मेळाव्यात बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे आर.सी. घरत, पनवेल विधानसभा अध्यक्ष काशिनाथ पाटील, शिवसेनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष शिरीष घरत, पनवेल काँग्रेसचे अध्यक्ष सुदाम पाटील, हेमराज म्हात्रे, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक देवा मडवी काँग्रेसचे कमांडर कलावत आदी मान्यवर उपस्थित होते.