आगरी समाजाच्या आजी-माजी आमदार, खासदारांची बैठक

। पनवेल । वार्ताहर ।
सातत्याने विस्थापित होण्याचा ससेमीरा पाठीमागे लागलेल्या आणि आपल्याच मायभूमीतून बेदखल व्हावे लागत असलेल्या आगरी समाजाच्या मूलभूत प्रश्‍नांवर, त्यांच्या जटील समस्यांवर विचारविनिमय करण्यासाठी, तसेच येणार्‍या नव्या आव्हानांचा मागोवा घेण्यासाठी आगरी जातीचे सर्व आमदार, खासदार आणि समाजातील प्रमुख मान्यवरांची एकत्रित बैठक पनवेल येथील व्ही. के. हायस्कूलच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये गुरुवारी (दि.16) रोजी सकाळी 11 वाजता कोरोनाचे सर्व नियम पाळून आयोजित करण्यात आल्याची माहिती अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यकांत पाटील यांनी दिली आहे. विखुरलेल्या स्वरुपात असंघटित आगरी जातीला नगण्य समजून त्याला ना सत्तेचा ना आरक्षणाचा वाटा मिळाला. या सापत्न वागणुकीबरोबरच वाढत्या मॅग्रोजच्या आक्रमणामुळे मालकी हक्कावर येऊ लागलेली आच, गरजेपोटी बांधलेल्या भूमीपुत्रांच्या घरांवर निर्दयपणे पडू लागलेला हातोडा, आरक्षण, स्वतंत्र जनगणना आणि अशा विविध मुद्यांवर या बैठकीत व्यापक चर्चा केली जाणार आहे.

Exit mobile version