काजू प्रक्रिया उद्योगाबाबत शेतकर्यांना मार्गदर्शन
। कोर्लई । वार्ताहर
कोकण विभागीय कृषी सहसंचालक प्रमोद लहाळे यांनी मुरुड तालुक्यातील मजगांव येथील उपसरपंच प्रितम पाटील यांच्या काजू प्रक्रिया उद्योगाला व सर्वे गावाला भेट देऊन माहितीपर मोलाचे मार्गदर्शन केले.
कृषी विभागाचे जिल्हा अधीक्षक उज्वला बाणखेले, उपप्रकल्प सिताराम कोलते, जिल्हा कृषी विकास अधिकारी खुरकुटे, उपविभागीय कृषी अधिकारी दत्तात्रेय काळभोर, तालुका कृषी अधिकारी विश्वजित आहिरे, बी.टी.एम.सुरेंद्र भंडारी, कृषी सहाय्यक आदिराज चौलकर, विशाल चौधरी, मनोज कदम, अतुल उपाध्ये, मनीषा काळे यांसह कृषीमित्र व शेतकरी बांधव उपस्थित होते.
आधुनिक शेती पद्धतीत भात लागवड तंत्रज्ञानाच्या पद्धती, मानव चलित भात लागवड यंत्राद्वारे भात लागवड केल्यास श्रम, वेळ व पैशाची बचत होते. तसेच चार सुत्री पद्धतीने भात लागवड केल्यास होणारे फायदे याबाबत सहसंचालक प्रमोद लहाळे यांनी शेतकर्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.






