रायगडचे जिल्हाधिकारी कल्याणकर यांच्या समवेत महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाची बैठक

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

आज रायगडचे जिल्हाधिकारी कल्याणकर यांची महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. नैसर्गिक गरजेपोटी बांधलेली सर्व बांधकामे नियमित करण्यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री आदीती तटकरे यांच्या समवेत सह्याद्री अतिथीगृहात उच्चस्तरीय अधिकारी व महाविकास आघाडीचे प्रमुख नेते यांची बैठक झाली होती. यावेळी ती बांधकामे नियमित करण्यासाठी ठाणे व रायगड जिल्हाधिकारी यांच्या मार्फत परीक्षण करण्याचे ठरले.

त्या बाबतीची पुढील कार्यवाही पुढे झालेली आहे. ठाणे येथील एका एजेंसी ला परीक्षण करण्याचे काम दिलेले आहे व त्या परीक्षणसाठी लागणारा खर्च सिडको महामंडळ भरण्यास तयार आहे. तरी लवकरच गावठाणातील घराचा परीक्षण होऊन नैसर्गिक गरजेपोटी बांधलेली बांधकामे नियमित होतील असे महाविकास आघाडीच्या नेत्यांना वाटत आहे.

आजच्या जिल्हाधिकारी यांच्या बैठकीसाठी पनवेल उरण महाविकास आघाडीचे अध्यक्ष बबनदादा पाटील,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत,शिवसेनेचे उत्तर जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर, माजी आमदार मनोहर भोईर, पनवेल काँग्रेस अध्यक्ष आर सी घरत,पनवेल महानगर पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे , महाविकास आघाडीचे सचिव सुदाम पाटील, समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अनिल नाईक, शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस गणेश कडू , शशी डोंगरे, रामदास पाटील, नरहरी मढवी,समाजवादी पक्षाचे अलिबाग तालुका अध्यक्ष अश्रफ घट्टे मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version