| माणगाव | वार्ताहर |
माणगाव शिवजयंती उत्सव व रक्तदान शिबीर सेवाभावी संस्थेची दि.19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्त झालेल्या महारक्तदान शिबिराच्या जमा-खर्चाची विशेष सभा रविवारी (दि. 3) संस्थेचे कार्याध्यक्ष ज्ञानदेव पवार व संस्थाध्यक्ष सलीम शेख यांच्या विशेष उपस्थितीत झाली. सभेच्या सुरुवातीला संस्थेचे सचिव शंकर शिंदे यांनी सर्व उपस्थित पदाधिकारी व सभासद यांचे स्वागत केले. त्यानंतर संस्थचे खजिनदार अरुण क्षीरसागर यांनी जमा खर्चाचा हिशोब वाचून दाखविला तो हिशोब सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
यावेळी रक्तदान शिबिरात सहभागी झालेल्या संस्था-संघटना यांच्या प्रतिनिधींना केइएम रुग्णालय परेल मुंबई यांचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच, सभेत शुक्रवारी (दि. 8) सकाळी 11 वा. माणगाव शासकीय विश्रामग्रहात माणगाव या ठिकाणी जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा विशेष सन्मान करण्याचा कार्यक्रम घेण्याचे ठरले आहे. या सभेला आजेश नाडकर, विवेक ढेपे, मजिद हाजिते, सचिन देसाई, अरुण क्षीरसागर, भालचंद्र खाडे, उमेश यादव, अमोल पवार, प्रा. हर्षल जोशी, प्रा.विजय पाईकराव, रामदास गाडे, अजित शेडगे, सचिन पेंडसे, बाळा पवार आदी उपस्थित होते.