महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या कोकण विभाग पदाधिकाऱ्यांची सभा


| माणगाव | वार्ताहर |

अशोकदादा साबळे विद्यालय, माणगाव येथे शिक्षक परिषद कोकण विभाग पदाधिकारी सभा रविवार (दि. 7) माणगाव येथे राज्याध्यक्ष वेणूनाथ कडू यांच्या प्रमुख उपस्थित कोकण विभाग अध्यक्ष गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षेखाली संपन्न झाली. सभा प्रारंभी दिवंगताना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

राज्यअध्यक्ष वेणूनाथ कडू यांनी 17 व 18 फेब्रुवारी रोजी नागपूर येथे संपन्न होणाऱ्या राज्य अधिवेशन याबाबत सखोल मार्गदर्शन केले तसेच जिल्हा पालक म्हणून पालघर वेणूनाथ कडू, ठाणे, गुलाबराव पाटील, उल्हासनगर हेमलता मुनोत, रत्नागिरी -विजय भामरे, नवीन मुंबई पनवेल अनिल पाटील, रायगड लक्ष्मण वालगुडे यांची नियुक्ती जाहीर केली. तसेच कोकण विभाग मार्गदर्शक इनामदार व कोकण विभाग उपाध्यक्षपदी हेमलता मुनोत यांची नियुक्ती केली.

यासभेस रायगड जिल्हा अध्यक्ष विजय दरेकर, रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे, पनवेल महानगर अध्यक्ष अनिल पाटील , रायगड कार्याध्यक्ष दिलीप उभारे, रायगड कार्यवाह रवी जाधव, रायगड कोषाध्यक्ष सचिन पाटील, सोमनाथ कराड, शिवनाथ दराडे, अंकुश शेंडगे, भरत काळे, पोलादपूर तालुका अध्यक्ष सुरेश साबळे, गणेश पाटील, कदम सर, मोटे सर, मनीषा भामरे, शुभांगी बने आदी उपस्थित होते.

Exit mobile version