कोरलवाडी आदिवासींच्या प्रस्तावातील त्रुटींच्या पूर्ततेसाठी अधिकार्‍यांची बैठक

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
पनवेल तालुक्यातील आपटा ग्राम पंचायत हद्दीतील कोरलवाडी आदिवासी वाडीच्या रस्त्या संबंधित शुक्रवारी सायंकाळी उप वनसंरक्षक रायगड यांच्या अलिबाग येथील कार्यालयात सहाय्यक उप वनसंरक्षक एस.एन.वाघमोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत दस्तावेज तापसणी व त्रुटींच्या निराकरणासाठी 3(2) प्रस्तावाशी संबंधित सर्व विभागा प्रतिनिधींची संयुक्त बैठक घेण्यात आली.

या बैठकीस आदिवासिंच्या मूलभूत हक्कांसाठी लढणारे ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर, पेण वनपरिक्षेत्र अधिकारी पाटकर, पनवेल वनपरिक्षेत्र अधिकारी ज्ञानेश्‍वर सोनवणे,रा.जि. प. बांधकाम विभाग उप अभियंता कुलकर्णी, पनवेल शाखा अभियंता अनिल जाधव, ग्रामपंचायत आपटा उप सरपंच वृषभ धुमाळ, दर्शन भोईर, ग्राम विकास अधिकारी शेंडगे, ग्रुप ग्रामपंचायत कर्नाळा सरपंच साबिर दळवी, ग्राम विकास अधिकारी नरेश भोनकर, उप वन संरक्षक कार्यालयातील वाणी सर्वेयर बनसोडे, ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे समन्वयक उदय गावंड, कोरलवाडी ग्रामस्थ प्रतिनिधी संतोष पवार, राजेश वाघे, भानुदास पवार, सचिन वाघे आदी उपस्थित होते या बैठकीत सर्व त्रुटींची पूर्तता करण्यात आली असून. वन विभागाकडून आदिवासी जमाती व अन्य पारंपारिक वनवासी अधिनियम दोन हजार सहा व वन कायदा 2008 नुसार 3 (2) च्या प्रस्तावास येत्या मंगळवारपर्यंत अंतिम मंजुरी देण्यात येईल, असे सहाय्यक वनसंरक्षक एस.एन.वाघमोडे यांनी सांगितले तर वन विभागाने आदिवासी बांधवांच्या उपोषणानंतर जी कार्यतत्परता दाखविली ती ह्या अगोदर दाखविली असती तर कोरलवाडीतील आदिवासींना पाच वर्षांपूर्वीच हक्काचा मार्ग मिळाला असता त्यामुळे किमान यापुढेतरी जिल्ह्यातील अजून शेकडो आदिवासी वाड्यांच्या प्रस्तावाबाबत सर्व विभागांकडून अशीच सकारात्मकता दिसेल या आशेसह सर्वांचे आभार मानले.

Exit mobile version