निवृत्त पोलिसांची सभा उत्साहात

| खारेपाट | वार्ताहर |
पोलीस मुख्यालय रायगड-अलिबाग येथील जंजिरा सभागृहामध्ये निवृत्त पोलीस कल्याणकारी संस्था, रायगड यांची त्रैमासिक सभा व त्यापूर्वी सकाळी पोलीस मुख्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन अध्यक्ष राजेंद्र कासार यांच्या हस्ते करण्यात आले.या सभेकरिता पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी निवृत्त पोलीस कर्मचार्‍यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. त्यावर काय काय उपाययोजना करता येतील याबाबत माहिती दिली.

संस्था अध्यक्ष राजेंद्र कासार यांची शिखर संस्था (कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य) कार्यकारिणीमध्ये सहसल्लागारपदी निवड झाल्याबद्दल संस्थेच्यावतीने सुदेश पालकर यांनी शाल, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी अध्यक्ष राजेंद्र कासार, उपाध्यक्ष झावरे, सुरेश म्हात्रे, कोषाध्यक्ष- सुनील गोंधळी, सचिव दिलीप पाटील, सदस्य शंकर पाटील, पुरी, माळी आदी मान्यवर उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन अरुण मोरे, सुदेश पालकर, चांदोरकर यांनी केले.

Exit mobile version