जिल्ह्यातील सेवानिवृत्तीधारकांचा मेळावा

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
पोलिस मुख्यालय,अलिबाग येथील ‘जंजीरा’ सभागृहात रायगड जिल्हा कोषागार अधिकारी कार्यालयातर्फे जिल्ह्यातील सेवानिवृत्तीधारकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा कोषागार अधिकारी माधव रामा सराई होते. सर्वप्रथम कोषागार कार्यालयाचे लेखाधिकारी उद्धव जोशी यांनी प्रास्ताविक करताना मेळाव्याची उद्दिष्टे सांगतानाच मेळाव्यासाठी उपस्थित असलेले जवळपास शंभरहून अधिक पेंशनर्सच्या अडचणी जाणून घेतल्या.

मेळाव्यामधे प्रामुख्याने रायगड जिल्हा सेवानिवृत्त माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील, कार्याध्यक्ष बी.पी.म्हात्रे, उपाध्यक्ष एस.एम.ठाकूर, सचिव सुरेश पाटील, खजिनदार चंद्रकांत नवगिरे, उल्हास ठाकूर तसेच प्राथमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी वावेकर गुरुजी व अन्य पदाधिकारी पेंशनर्स यांनी विविध प्रश्नांवर चर्चा केली. कोषागार कार्यालयाचे कर्मचारी तुकाराम मुंडे, रमेश निर्मळ, शितल सिराळ, सुधाकर नर्सिकर उपस्थित होते. श्रीकांत पाटील यांनी यावेळी पूर्व सूचना न देताच आय कर कापणे, सोळा नंबर फॉर्म लवकर सर्वांना घरपोच मिळणे, हयातीचा दाखला ‌बॅंकेकडून न मिळाल्यास पेन्शन रोखणे व पेंशन रकमेची विगतवारी इत्यादी समस्यांचे निराकरण करुन घेतले. शेवटी सर्वांचे आभार मानून मेळाव्याची सांगता झाली.

Exit mobile version