जातीच्या दाखल्याबाबत महत्वपूर्ण चर्चा; रोहा तालुका युवक कार्यकारिणी निवड
। कोलाड । वार्ताहर ।
रोहा तालुक्यात अनेक वर्ष कार्यरत असलेल्या रोहा तालुका कुणबी समाज उन्नती संघ मुंबई ग्रामीण शाखा तालुका रोहाची कार्यकारिणी सभा कुणबी भवन येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
सदर सभेस कुणबी समाज नेते शंकरराव म्हसकर, सुरेश मगर, मुंबई संघ सल्लागार शिवरामशिंदे, तालुका अध्यक्ष रामचंद्र सकपाळ, उपाध्यक्ष अनंत थिटे, शंकरराव भगत, बाबुराव बामने, रामचंद्र चितळकर, शिवराम महाबळे, दत्ताराम झोलगे, मारूती खांडेकर, सुहास खरिवले, सतिश भगत, मुकेश भोकटे, महेश ठाकुर, महेश बामुगडे, पांडूरंग कडू, खेळु ढ़माले, गुनाजी पोटफोडे, निवास खरिवले, यशवंत हलदे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सभेच्या अजेंड्याप्रमाणे विषय घेण्यात आले. जमा खर्चाचे वाचन झाल्यानंतर रोहा तालुका युवक कार्यकारिणी निवड या महत्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यात आली. तालुक्यात असणारा बहुसंख्य कुणबी समाज अणि या समाजाचे प्रश्न सोडविण्याकरिता युवकांवर येऊन पडलेली जबाबदारी याकरिता कुणबी समाजाकरिता तन-मन-धनाने काम करणारी युवा पिढी पुढे येणे गरजेचे आहे. याकरिता समाजाने कर्तृत्ववान शिलेदार यांची निवड केली.
तालुका युवक अध्यक्षपदी मुकेश भोकटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी प्रशांत महाले, शैलेश बाईत, सरचिटणीस रविंद्र शिंदे, खजिनदार महेश तुपकर या सर्वांची उपस्थित सभेत अभिनंदन करण्यात आले.महिलेने चूल मुल संभाळावे हा जमाना आता गेला असून माझ्या समाजातील महिलांचे प्रश्न सोडविण्याकरिता मला पुढे आले पाहिजे म्हणत कुणबी रणरागिणी पुढे आल्या आहेत.
तालुका महिला अध्यक्षपदी दिपिका भगत, उपाध्यक्षपदी वीणा चितळकर, आशा शिंदे, गीता गंभे, विशाखा राजिवले, सरचिटणीस शिल्पा मरवडे, सहसचिव सपना रटाटे, सल्लागार जिज्ञासा तुपकर, सल्लागार नंदा म्हसकर, सल्लागार प्राची राऊत यांची निवड करण्यात आली. सर्वांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी सभेपुढे महत्वपूर्ण विषय गाजला तो कुणबी समाजाच्या जातीच्या दाखल्यांचा आणि विद्यार्थ्याचे होणार्या नुकसानीचा. सदर विषय हा कुणबी नेत्यानी गांभीर्याने घेतला असून भविष्यात या विषयावर तोडगा काढण्याकरिता प्रयत्नशील राहू असे संगितले. रोहा तालुक्यात जातिवंत कुणबी आहेत हे कोणी नाकारु शकत नाही. मात्र जाचक अटीमुळे दाखला मिळत नाही या अटी शिथिल व्हाव्यात, अशी मागणी करण्यात आली.