संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची सभा संपन्न

| कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची यंदाची पहिली सभा संपन्न झाली. या सभेत 32 लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले. हे सर्व अर्ज ग्रामीण भागातील होते. तालुक्यातील जास्तीत जास्त लाभार्थींना लाभ मिळावा. यासाठी सर्व सदस्यांनी प्रयत्न करावा, असे सूचित करण्यात आले.


कर्जतच्या तहसीलदारांच्या दालनात संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी यंदाची ही पहिलीच सभा असल्याने नवनिर्वाचित अध्यक्ष व सदस्यांचा तहसीलदार विक्रम देशमुख यांनी सत्कार केला. मनोहर थोरवे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा सुरू झाली. भाई गायकर, शिवराम बदे, विजय मांडे, ऋषीकेश भगत, अमर साळोखे, कांता पादिर, पूजा सुर्वे, गट विकास अधिकारी छत्रसिंग रजपूत, नगरपरिषदेचे जितेंद्र गोसावी, नायब तहसीलदार विजय चव्हाण, अव्वल कारकून गोवर्धन माने आदी उपस्थित होते. तहसीलदार देशमुख यांनी सदस्यांना या योजनेबद्दलची माहिती सांगितली. त्यानंतर मागील प्रस्तावित अर्ज सभेपुढे ठेवण्यात आले. हे सर्व अर्जामध्ये आवश्यक कागदपत्रे असल्याने सर्वच्या सर्व 32 अर्जांना मंजुरी देण्यात आली.


2022 मार्च अखेर पर्यंत संजय गांधी निराधार योजनेंतर्गत सर्वसाधारण 1046 व्यक्तींना, अनुसूचित जातीच्या 255 व्यक्तींना, अनुसूचित जमातीच्या 251 व्यक्तींना, श्रावण बाळ सेवा निवृत्ती वेतन योजनेंतर्गत 171 सर्वसाधारण व्यक्तींना, 38 अनुसूचित जातींच्या व्यक्तींना, 37 अनुसूचित जमातीच्या व्यक्तींना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेंतर्गत 777 व्यक्तींना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेंतर्गत 189 व्यक्तींना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजनेंतर्गत 29 व्यक्तींना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय कुटुंब लाभ निवृत्ती वेतन योजनेंतर्गत 41 व्यक्तींना अशा एकूण 2834 व्यक्तींना दरमहा लाभ मिळत असल्याची माहिती तहसीलदार विक्रम देशमुख यांनी दिली.

Exit mobile version