आदिवासी महिला बचत गटांचा मेळावा

पाली/बेणसे । वार्ताहर ।
क्रांतिवीर हुतात्मा महादू कातकरी आदिवासी समाज भवन परळी येथे आदिवासी कातकरी समाज महिला बचत गट यांचा भव्य मेळावा नुकताच पार पडला.या मेळाव्यात रोजगार निर्मिती,महिला सक्षमीकरण,संस्कृती परंपरेचे जतन,सकस आहारपद्धती,कृषी क्रांती आदींवर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी रानावनातील रान भाज्या,कंदमुळे पौष्टिक सकस व जीवनसत्व युक्त आहार मान्यवरांना देण्यात आला, तसेच या पदार्थांची माहिती देखील देण्यात आली.
बचत गटांना प्रगतशील मार्गावर जाण्यासाठी कोणकोणते बदल व कृती करणे गरजेचे आहे हे पटवून दिले. कृषी अधिकारी मिलिंद चौधरी यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञान युक्त शेती याद्वारे उत्पादन वाढ करणे,वापरात येणारी अवजारे,बी बियाणे वापरा संदर्भात माहिती दिले. उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले.विस्तार अधिकारी सुनिल अहिरे, विजय यादव यांनी आदिवासी कातकरी बांधवांच्या उत्कर्षासाठी व सक्षमीकरणासाठी आवश्यक त्या शासन योजना व उपक्रम राबविणे यासंदर्भात माहिती दिली, तसेच आदिवासी समाजाच्या समस्या व प्रश्‍न जलदगतीने सोडविणार असल्याची ग्वाही दिली.पाली पंचायत समिती सभापती रमेश सुतार यांनी बचत गटांना बीबीयाने किट वाटप करण्यात आले.उपसभापती उज्वला देसाई यांनी महिला सक्षमीकरण या विषयावर बहुमोल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास पाली पंचायत समिती सभापती नंदू सुतार, उज्वला देसाई, विजय यादव, सुनिल अहिरे, मिलिंद चौधरी, बचत गटाचे श्री पाटील, संदेश कुंभार, सिंदकर, गुलाब वाघमारे, रमेश पवार, भाई कुमार, माई पवार, राया पवार,चंद्रकांत जाधव, देऊ वाघमारे, विष्णू वाघमारे,दगडू वाघमारे, किसन वाघमारे, गौरु वाघमारे, गणपत वाघमारे, सुरेश पवार,सोनू पवार,मारुती घोगरकर आदी मान्यवर, आदिवासी समाज बांधव उपस्थित होते.

Exit mobile version