। उरण । वार्ताहर ।
उरण पोलीस ठाणे हद्दीतील धार्मिक स्थळ- मंदिर, मस्जिद, दर्गे, चर्च, बुध्दविहार यांची विश्वस्त,पदधिकारी, मालक, देखरेख करणारे पुजारी यांची कोकण ज्ञानपिठ महाविदयालय, उरण येथील कक्षात बैठक घेण्यात आली. सदर बैठकीमध्ये उपस्थितांना देव-देवतांचे दागिने सुरक्षित ठेवणे, यात्रा उत्सव विहीत वेळीत आयोजित करणे, ध्वनिक्षेपकाची परवागनी घेणे, मंदिरा सभोवताली पुरेसा प्रकाश व्यवस्था करणे, सीसीटीव्ही कॅमेरे लावणे, मंदिराचे दरवाजे लावणे, मंदिराचे सुरक्षितेच्या दृष्टीने सुरक्षा रक्षक नेमणे इत्यादी बाबत मार्गदर्शन करून सुचना देण्यात आल्या आहेत. यावेळी उपस्थितांना उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने, पोलीस नाईक भीमराज शिंदे यांनी मार्गदर्शन केले. सदर बैठकीकरीता उरण पोलीस ठाणे हद्दीतील धार्मिक स्थळांचे 60/70 विश्वस्त, पदधिकारी, मालक, देखरेख करणारे पुजारी उपस्थित होते.
धार्मिक स्थळांच्या सुरक्षिततेबाबत बैठक
