उद्योगपती गौतम अदानी यांच्यासोबत भेट

। मुरुड जंजिरा । वार्ताहर ।
दिघी पोर्ट लिमिटेड येथे अदानी फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरु असलेल्या विविध उपक्रमांना कंपनीचे मालक उद्योपगती गौतम अदानी यांनी भेट देऊन युवक, महिलांशी संवाद साधला. राजपुरी, आगरदांडा, दिघी, कुडगाव ग्रामपंचायत येथे शिक्षण, आरोग्य, शाश्‍वत आजीविका आणि पाणी संवर्धन यावर कार्य संचालन सुरू आहे. राजपुरी ग्रामपंचायत येथील सोमजाई महिला बचत गट यांना अदानी फाऊंडेशनच्या माध्यमातून मसाला व्यवसायाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्यात आला.

बचतगटातील महिलांना खादी ग्रामोद्योग विकासाच्या माध्यमातून प्रशिक्षण, व्यवसाय मार्केटिंग, कौशल्य तसेच पॅकेजिंग यावर प्रशिक्षित करण्यात आले आणि यांतर्गत 45 किलोग्रॅम मसाला महिलांनी तयार केला. ग्राम भारती 2022 या कार्यक्रमाच्या अंतर्गत राजपुरी कोळीवाडा येथील दामिनी अनिकेत घागरी यांना सहभागी होण्याची संधी मिळाली. प्रत्यक्ष अदानी समूहाचे गौतम अदानी यांच्या समक्ष दामिनी घागरी यांनी संवाद साधून अदानी फाउंडेशन चे आभार व्यक्त केले.

दिघी येथील रांगोळी कलाकार मदन कावळे आणि जगन पाटील यांनी गरबा नृत्यावर आधारित रांगोळी सलग 18 तास मेहनत घेऊन तयार केली. या रांगोळीला प्रत्यक्ष उद्योगपती गौतम अदानी यांनी भेट दिली. नवरात्री थीम वर आधारित अप्रतिम व सुरेख रांगोळी अदानी कार्पोरेट हाऊस अहमदाबाद येथे काढल्याबद्दल अदानी समूहाचे चेअरमन यांनी मदन कावळे व जगन पाटील यांचे मन भरून कौतुक केले. त्यांच्या कला कौशल्या बद्दल आणि आवड यांवर चर्चा करण्यात आली .

दिघी कोळीवाड्यातील युवकांना हा लाख मोलाचा दिवस ना भूतो न भविष्यती स्मरणात राहील. युवकानी अदानी फाऊंडेशनचे मनापासून आभार व्यक्त केले. राजपुरी व दिघी कोळीवाड्यातील युवकांनी व महिला यांनी पहिल्यांदा जीवनात अहमदाबाद शहराला भेट दिली हे सर्व बघून त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. सर्वांना अहमदाबादर्यंत येण्याची संधी दिली व अदानी समूहाचे उद्योगपती गौतम अदानी आणि प्रीती अदानी यांच्यासोबत प्रत्यक्ष गाठभेट घडवून आणली म्हणून सर्वांनी अदानी फाउंडेशनचे आभार व्यक्त केले आहेत.

Exit mobile version