महाविकास आघाडीच्या बैठका सुरूच

। मुंबई । प्रतिनिधी ।
शिवसेनेतील बंडखोरीनंतर राज्यातील महाविकास आघाडीचं स्थैर्य धोक्यात आलं आहे. या पार्श्‍वभूमीवर महाविकासआघाडीच्या घटकपक्षांकडून बैठकांवर बैठका सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर आता आघाडीतील घटकपक्ष असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन शरद पवार यांची भेट घेतली दुसरीकडे बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे यांनीही आपल्या गटाची बैठक बोलावली आहे.

काँग्रेस नेते सिल्व्हर ओकवर
काँग्रेसचे विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात व अशोक चव्हाण यांनी रविवारी मुंबईत सिल्व्हर ओक येथे शरद पवार यांची भेट घेतली. तसेच राज्यातीलय राजकीय घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर चर्चा केली. या बैठकीत महाविकासआघाडीच्या स्थैर्याबाबत रणनीती तयार करण्यात आल्याचीही चर्चा आहे.

सर्वाधिकार शिंदेंना
शिंदे गटाकडून गुवाहटीत बैठका घेतल्या जात आहेत. बंडखोर आमदारांनी आपल्याबाबतचे निर्णय घेण्याचे सर्वाधिकार एकनाथ शिंदे यांना दिले आहेत. याशिवाय एकनाथ शिंदे यांनी बंडखोरांच्या वतीने बाजू मांडण्यासाठी आमदार दीपक केसरकर यांना जबाबदारी दिली आहे. त्यामुळे माध्यमांना प्रतिक्रिया देणं टाळणारे बंडखोर माध्यमांशीही बोलताना दिसत आहेत.

उदय सामंतही शिंदे गटात
कॅबिनेट मंत्री उदय सामंत हेदेखील बंडखोर गटात सामील होण्यासाठी गुवाहाटीत दाखल झाले. बंडखोरांच्या गटात सामील झालेले सामंत हे शिवसेनेचे आठवे मंत्री आहेत.

राष्ट्रवादीने कंबर कसली
सरकार वाचवण्यासाठी राष्ट्रवादीने कंबर कसली असून बैठाकांचे सत्र सुरु आहे. या बैठकीत शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना काही सूचना केल्या असल्याची माहिती मिळत आहे. 16 बंडखोरांच्या निलंबनाच्या मुद्द्यावर या बैठकीत खलबतं झाली असून कायदेशीररित्या लढू असं पवारांना स्पष्ट केल्याचे समजते आहे. आज पहाटेपासून तिन्ही पक्षांतील महत्वाच्या नेत्यांनी या बैठकीसाठी सिल्व्हर ओकवर येऊन गेले आहेत. अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, सेनेचे अनिल परब आणि देसाई यांनीही पवारांची भेट घेतली आहे. या नेत्यांमध्ये सव्वातासांची बैठक पार पडली आहे.

Exit mobile version