विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
| माणगाव | प्रतिनिधी |
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या विद्यमाने रायगड व सातारा जिल्हा यांच्या तर्फे माणगाव येथील अल्ताफ धनसे यांच्या मैदानावर रविवारी (दि.28) मोफत महा पोलीस डेमो भरतीचे आयोजन करण्यात आले होते. या पोलीस डेमो भरतीत रायगड व सातारा जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील, गावांतील सुमारे 3,200 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. या डेमो भरतीत उंच उडी, लांब उडी, धावणे यांसारख्या स्पर्धा घेण्यात येऊन विद्यार्थ्यांना पोलीस भरतीसाठी उत्कृष्ठ असे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
जिजाऊ संस्थेच्यावतीने घेण्यात आलेल्या या मोफत महा पोलीस डेमो भरतीचे उद्घाटन मंत्री भरत गोगावले व जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांच्याहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमोद घोसाळकर, माणगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र बेलदार, चंद्रकांत कळंबे, ज्ञानदेव पवार, विपुल उभारे, परेश कारंडे, ॲड.महेंद्र माणकर, नितीन दसवते, विकास गायकवाड, डॉ. परेश उभारे, केदार चव्हाण, एकनाथ होबले, प्रसाद धारिया, विजय मेथा, रणधीर कनोजे, दिनेश हरवंडकर, सिद्धेश सत्वे, जितेंद्र तेटगुरे, मंगेश कदम, मनोज पवार, प्रवीण बागवे,जिजाऊ संस्थेचे कार्यकर्ते निलेश म्हात्रे, उमेश यादव, वैभव मोरे, मिलिंद शेलार, गौरव करचे आदी मान्यवरांसह रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातून जिजाऊ संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






