कांळबादेवी पंचक्रोषी गडब विजेता
| गडब | वार्ताहर |
अरुण क्रीडा मंडळ पाटणी यांचे विद्यममाने रायगड जिल्हास्तरीय चाळीस वर्षावरील पुरुष गटाच्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत कांळबादेवी पंचक्रोषी गडब संघाने विजेतेपद मिळविले. कांळबादेवी पंचक्रोषी गडब संघात राकेश पाटील, प्रीतम केनी, संतोष म्हात्रे, अनंत बैकर, समीर कोठेकर, सचिन म्हात्रे, लक्ष्मण कोठेकर, विश्वनाथ म्हात्रे, कुमार म्हात्रे, महेश कोठेकर, किशोर कोठेकर, महेंद्र कोठेकर, संघ प्रशिक्षक – लक्ष्मण म्हात्रे, संघ व्यवस्थापक – अनंत पाटील यांचा समावेश होता तर या संघाला उद्योजक प्रशांत म्हात्रे पुरस्कुत केले होते.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक काळंबादेवी पंचक्रोशी गडब, द्वितीय क्रमांक ग्रामस्थ कासु, तुतीय क्रमांक गणेश क्लब बोकडवीरा उरण, चतुर्थ क्रमांक नवतरुण कारावी, सर्वोत्कृष्ट खेळाडू राकेश पाटील (गडब), उत्कृष्ट पक्कड सुरेश पाटील (कारावी), उत्कृष्ट चढाई राजन तांडेल (कासु ), पब्लिक हिरो भारत पाटील ( उरण ), शिस्तबद्ध संघ यंग स्टार कुर्डुस ठरला.
या स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख विष्णु पाटील, जिल्हा समन्वयक नरेश गांवड, माजी जि.प.सदस्य गजानन बोरकर, चंद्रकांत बोरकर यांचे हस्ते करण्यात आले. या स्पर्धेवर स्पर्धा निरिक्षक लक्ष्मण गांवड यांनी काम पाहिले. या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील संजय म्हात्रे, गिरधर थळे, संजय मोकल, कैलास पाटील, सुरेश पाटील, महेश मोकल, गुरुनाथ शेरमकर, सुरेश पाटील, नितिन समजिस्कर, राजु समजिस्कर, राकेश पाटील, लिलाधर पाटील, भारत पाटील, संकेत पाटील आदि जिल्ह्यातील मातब्बर जेष्ठ खेळांडुृ या स्पर्धेत खेळले. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे ही स्पर्धा वेळेवर सुरु झाली व पंचानी दिलेले निर्णय खेळांडुनी मान्य केले. पंचाचे निर्णयावर कोणताही आक्षेप घेतला नाही. शिस्तबध्दपणे या स्पर्धेतज्येष्ठ खेळांडुनी खेळ करुन नवोदीत खेळांडुसमोर आदर्श ठेवला.