स्पर्धेला रोमांचकारी फेरीचे स्वरूप; उपांत्य लढतीचा थरार शिगेला
| ठाणे | क्रीडा प्रतिनिधी |
महाराष्ट्र खो-खो असो. व दि ॲमच्यूअर खो-खो असो. ठाणे यांच्या मान्यतेने आणि धी. युनायटेड स्पोर्ट्स क्लब ठाणे यांच्या आयोजनाखाली विभागीय पुरुष व महिला खो-खो स्पर्धेला रोमांचकारी फेरीचे स्वरूप लाभले आहे. यावेळी उपउपांत्य फेरीतील चुरशीच्या लढतींनी मैदानात उत्साहाचे वातावरण निर्माण केले होते. या स्पर्धेच्या उपांत्य सामन्यांतील महिलांमध्ये ज्ञानविकास विरूद्ध शिवभक्त व युनायटेड विरूद्ध रा. फ. नाईक आणि पुरुषांमध्ये श्री समर्थ विरूद्ध ग्रिफिन व शिर्सेकर महात्मा गांधी विरूद्ध ज्ञानविकास या लढती रंगणार आहेत.
महिलांच्या उपउपांत्य सामन्यात यजमान धी युनाटेड स्पोर्ट क्लबने शिर्सेकर महात्मा गांधी संघाचा अटीतटीच्या सामन्यात व जादा डावात 12-11 (मध्यंतर 4-4, 3-3 व 5-4) असा एक गुणाने पराभव करत विजयाचा जल्लोष केला. युनाटेडच्या स्नेहा आहेर, नम्रता पडये, कृतिका ठाणेकर, अंजली कनोजा यांनी धमाकेदार खेळ करत रात्रीच्या थंडीत बहारदार खेळ करत प्रेक्षकांना खिळवून ठेवले. पुरुषांच्या उपउपांत्य सामन्यात श्री समर्थ व्यायाम मंदिरने विहंग क्रिडा मंडळावर 11-10 (मध्यंतर 4-4) असा 1 गुणाने पराभव केला. श्री समर्थच्या वेदांत देसाई, हितेश आंग्रे, अनंत चव्हाण व विशाल खाके यांनी सुरवातीपासूनच सामन्यावर वर्चस्व राखत समाना खिशात घातला.
या व्यतीरिक्त पुरूषांच्या इतर सामन्यांमध्ये ग्रिफिन जिमखाना कोपरखैरणे यांनी आनंद भारती समाज ठाणे वर 16-9 असा 1 डाव राखून 7 गुणांनी, श्री सह्याद्री संघ मुंबई उपनगर यांनी राज क्रीडा मंडळ बदलापूर वर 18-11 असा 7 गुणांनी, श्री समर्थ व्यायाम मंदिर मुंबई यांनी प्रबोधन क्रीडा भवन मुंबई उपनगर वर 15-12 असा 3 गुणांनी, विहंग क्रीडा मंडळ ठाणे यांनी एनबिसिएस घणसोली वर 13-10 असा 1 डाव राखून 3 गुणांनी विजय मिळवला. तर, महिलांच्या विभागात शिर्सेकर महात्मा गांधी ॲकॅडमी बांद्रा यांनी अमरहिंद मंडळ दादर वर 9-5 असा 1 डाव राखून 4 गुणांनी, घी युनायटेड स्पोर्टस् क्लब ठाणे यांनी शिवनेरी सेवा मंडळ मुंबई वर 5-2 असा 1 डाव राखून 3 गुणांनी, रा. फ. नाईक महिला संघ यांनी न्यू बॉम्बे सेंटर स्पोर्टस् क्लब वर 10-6 असा 1 डाव राखून 4 गुणांनी, सरस्वती कन्या संघ माहीम यांनी आनंद भारती समाज ठाणे वर 14-6 असा 8 गुणांनी, रा. फ. नाईक महिला संघ कोपरखैरणे यांनी सरस्वती कन्या संघ माहीम यांचा 13-5 असा 1 डाव राखून 8 गुणांनी पराभव केला.
