बचतगटांना मार्गदर्शन शिबीर

। मुरुड जंजिरा । वार्ताहर ।
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत मुरुड तालुक्यातील मौजे सातिर्डे व महाळुंगे खुर्द येथे महिला किसान दिनानिमित्त प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत मत्स्य प्रक्रिया उद्योग विषयी महिला बचत गटांना मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते.
यावेळी सदर कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी विश्‍वनाथ अहिरे, जेएसडब्ल्यू कंपनीचे सीएसआर मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश शेडगे, मांडल सरपंच सुचिता पालवणकर व बचत गटांमधील महिला उपस्थित होत्या.
मुरुड तालुका कृषि अधिकारी विश्‍वनाथ आहिरे यांनी बचत गटांतील महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले की, एक जिल्हा एक उत्पादन प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनांर्गत मुरुड तालुक्यात मत्स्य उप उत्पादनातून ब्रँड तयार करावा आणि महिलांनी स्वतः उद्योजिका म्हणून पुढे येऊन महिला बचतगटांना सक्षमीकरणासाठी सहकार्य करावे असे आवाहन केले.

Exit mobile version