। पनवेल । वार्ताहर ।
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायलय, मुंबई यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड-अलिबाग यांच्या मार्गदर्शनाखाली दि.2 ते दि.14 ऑक्टोबर या काळात पॅन इंडिया अवेरनेसचे आयोजन करण्यात येत आहे. या अनुषंगाने गुरुवारी (दि.7) पनवेल तहसीलदार कार्यालयात ज्येष्ठ नागरिकांसाठी कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
तालुका विधी सेवा समिती पनवेल अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश पनवेल जिल्हा न्यायालय आर. जी. अस्मर यांच्या माध्यमातून गुरुवारी सकाळी 11 वाजता पनवेल तहसिल कार्यालयात स्कीम ऑफ लीगल अॅड सर्व्हिसेस बाबत सिनियर सिटीझन ऍक्ट या विषयावर जेष्ठ नागरीकांना मार्गदर्शन करण्यासाठी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख वक्ते म्हणून पनवेल बार असोसिएशनचे विधिज्ञ अनिल जाधव हे उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर व प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नागरीक संघटना पनवेल शहरचे अध्यक्ष नंदकुमार जयराम जोशी हे उपस्थित होते.