इंग्लंड, स्कॉटलंड संघाचे विलीनीकरण

। लंडन । वृत्तसंस्था ।

क्रिकेट विश्‍वात आगामी काही वर्षात मोठ्या हालचाली होताना दिसणार आहेत. त्याची सुरूवात इंग्लंड व वेल्स क्रिकेट बोर्ड आणि स्कॉटलंड क्रिकेट बोर्ड यांच्या विलीनीकरणाच्या चर्चेतून सुरू झाली आहे. इंग्लंड व वेल्स क्रिकेट बोर्ड आणि क्रिकेट स्कॉटलंडने लॉस एंजेलिसमध्ये 2028च्या ऑलिम्पिक स्पर्धेत पुरुष आणि महिला संघ ग्रेट ब्रिटन क्रिकेट संघ म्हणून उतरवण्याच्या योजनांबद्दल चर्चा सुरू केली आहे.

2028 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे आणि 1900 नंतर प्रथमच क्रिकेट ऑलिम्पिकमध्ये परतणार आहे. यावेळी बहुतेक देश त्यांच्या नेहमीच्या जर्सीत दिसतील, परंतु जर इंग्लंड पात्र ठरला तर ते उर्वरित ग्रेट ब्रिटन म्हणून खेळतील आणि त्यांना स्कॉटलंडच्या खेळाडूंना सोबत घेऊन एक संघ बनवावा लागेल. इसीबी आणि क्रिकेट स्कॉटलंड यांनी प्रस्तावित ग्रेट ब्रिटन क्रिकेट संघांवर एकत्र काम करण्याबाबत प्राथमिक चर्चा केली आहे. क्रिकेट स्कॉटलंडकडून यासाठी सकारात्मक आहेत, आणि खेळाडू व कर्मचारी योगदान देण्यास उत्सुक आहेत. परंतु, ही संघांची नामनिर्देशित प्रशासकीय संस्था असेल.

Exit mobile version