नागोठणे व्यापारी पतसंस्था आदर्श पतसंस्थेमध्ये विलीन

। अलिबाग । प्रतिनिधी ।
नागोठणे व्यापारी सहकारी पतसंस्था नागोठणे ही आर्थिक बाबतीत अतिशय सुस्थितीत असलेली नरेंद्र जैन व्यापारी व सहकारी संचालक यांच्या नेतृत्वाखाली पतसंस्था आदर्श नागरी सहकारी पतसंस्था मर्या., अलिबाग या सक्षम पतसंस्थेमध्ये विलीन झाली आहे.
सभासदांच्या व ठेवीदारांच्या हितासाठी नागोठणे व्यापारी पतसंस्थेच्या सभासदांना व संचालक मंडळास सदर पतसंस्था एखाद्या चांगल्या, नावाजलेल्या पतसंस्थेत विलीन करण्याची गरज भासत होती. तसा प्रस्ताव त्यांनी आदर्श पतसंस्थेसमोर मांडला. सदर प्रस्ताव आदर्श पतसंस्थेच्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात येऊन विलीनीकरण प्रस्ताव सहकार विभागाकडे पाठविण्यात आला होता. दि. 29 नोव्हेंबर 2021 रोजी राज्याचे मा. अप्पर निबंधक, सहकारी संस्था पुणे डॉ. पी.एल. खंडागळे यांनी विलीनीकरणाचा आदेश पारित केला असल्याचे आदर्श पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी सांगितले.
या पतसंस्थेच्या विलीनीकरणामुळे नागोठणे व्यापारी पतसंस्थेचे ठेवीदार व कर्जदार आणि कर्मचारी आता आदर्शचे सभासद होतील. विलीनीकरणामुळे त्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही. यापुढे त्यांना आदर्श पतसंस्थेच्या सभासदा प्रमाणे व कर्मचार्‍यांप्रमाणे सर्व सर्व लाभ मिळणार आहेत. यामुळे या विलीनीकरणामुळे रायगडच्या सहकार क्षेत्रात एक चांगला संदेश जाणार असल्याचे आदर्श पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी सांगितले.

Exit mobile version