। पाली । वार्ताहर ।
दहावी, बारावी परीक्षेत नेत्र दीपक यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा सुधागड तालुका मराठा समाजाच्यावतीने रविवारी पाली येथील मराठा समाज भवन येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमासाठी मराठा समाज अध्यक्ष धनंजय साजेकर, गटशिक्षण अधिकारी साधुराम बांगारे, विठ्ठल घाडगे, दत्ताराम पोंगडे, यशवंत कदम, गणपत सितापराव आदींसह मोठ्या संख्येने सर्व समाज बंधू भगिन, तरुण युवक, विद्यार्थी मित्र यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती. यावेळी सुधागड तालुक्यात प्रथम 3 क्रमांक प्राप्त केलेल्या दहावी व बारावी गुणवंतांना सन्मानचिन्ह, धनादेश, झाडे, भेटवस्तू, गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच, इतर गुणवंत विद्यार्थ्याना भेटवस्तू व झाडे देऊन सन्मानित करण्यात आले.