। मुरूड जंजिरा । वार्ताहर ।
मुरूड तालुक्यातील राजपुरी ग्रुप ग्रामपंचायती तर्फे सन 2023-24 मध्ये इयत्ता 10 वी आणि 12वी परीक्षा विशेष प्राविण्य मिळवून उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा नुकताच राजपुरी सरपंच सुप्रिया गिदी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच ईस्माइल जुबेर सिद्दीक यांनी करून अशा शैक्षणिक सोहळ्याची आवश्यकता विषद केली. या प्रसंगी सरपंच सुप्रिया गिदी, महाराष्ट्र राज्य मच्चीमार संघ अध्यक्ष विजय गिदी, राजपुरी मुस्लिम समाज उपाध्यक्ष इकबाल शिरसिकर, उंड्रे हायस्कूलच्या मुख्याध्यापिका रिजवाना हुर्जुक, शिक्षक दिनेश डोंगरीकर आदी मान्यवरांनी यांनी शैक्षणिक यश प्राप्त विद्यार्थ्यांना सुयोग्य मार्गदर्शन करून अभिनंदन केले.
इयता 12 वी प्रथम क्रमांक अझेंन इर्शाद हद्दादी (81.17 %), अनस मुबशीर सिद्दीक( द्वितीय क्रमांक (77.50%), तर ताझिंन नवाब आदमने, अविष्कार दिगंबर गिदी दोघांना विभागुन तृतीय क्रमांक (77%) इयत्ता 10वी मिहीर प्रकाश गीते प्रथम क्रमांक (83.6 %), सहेर अब्दुल रेहमान आदमने द्वितीय क्रमांक( 81.40 %), आश्लेषा दिगंबर गिदी तृतीय क्रमांक (79 %) यांना ट्रॉफी, प्रशस्तीपत्र आणि पेन देऊन विशेष गौरविण्यात आले. तसेच 10वी 12 वी उत्तीर्ण झालेल्या अन्य ऐकूण 84 विद्यार्थ्यांचा या सोहळ्यात गौरव करण्यात आला.
या प्रसंगी हेमंत नाईक, महेंद्र आंबटकर, भावना बाणकोटकर, वैशाली कुणबी, सफिया अनवरी, जाहिद सिद्दीक, अविनाश नाईक, मुजाईद कासकर, सीताराम आगरकर आदी पदाधिकारी सोहळ्यात उपस्थित होते.







