विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न

पनवेल शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने

। पनवेल । प्रतिनिधी ।

पनवेलचे शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार दत्तूशेठ पाटील यांच्या जयंती निमित्त सोमवारी (दि.8) सकाळी 11 वाजता पनवेल येथील वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात शेतकरी कामगार पक्ष आणि माजी आमदार दत्तूशेठ पाटील शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल तालुक्यातील विविध शाळांमधील दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पार पडला.

सदर कार्यक्रम माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी त्यांनी आपल्या प्रास्ताविकात आज तात्यांची जयंती आणि त्याच दिवशी त्यांच्या संस्थेच्या वतीने हा निश्‍चित करी कामगार पक्षाच्या वतीने दहावी व बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार दुग्धशर्करा योग असल्याचे सांगितले. यावेळी व्यासपीठावर पनवेल विधानसभा अध्यक्ष काशिनाथ पाटील, जे.एम म्हात्रे, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण शेठ घरत. पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक देवेंद्र मढवी, माजी नगरसेवक शंकर शेठ म्हात्रे, प्रकाश म्हात्रे, पनवेल विधानसभा उपाध्यक्ष अजित अडसूळ, नगरसेवक रवींद्र भगत आदी मान्यवर तसेच पनवेल तालुक्यातील शाळांमधील शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी आमदार दत्तूशेठ पाटील शिक्षण प्रसारक मंडळाचे सीईओ रा. गो पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या शिक्षक कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली. आणि हा कार्यक्रम संपन्न केला.

Exit mobile version