| प्रतिनिधी | अलिबाग |
अलिबाग तालुक्यातील थळ येथील राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्सच्या मधुबन महिला मंडळच्या वतीने शाळेतील दहावी-बारावी शालांत परीक्षेतील गुणवंत व तसेच मंडळाच्या सदस्यांच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
किहीमच्या स्वागत गेस्ट हाऊस मधील सभागृहात झालेल्या सादर कार्यक्रमात दहावीतील रवींद्र वर्तक 97.00 टक्के गुण, तनय गुरव 94.60 टक्के गुण, इयत्ता बारावी मध्ये मृणालिनी साठे 86.83 टक्के गुण, निनाद पाटील 84.00 टक्के गुण, यांच्यासह अन्य विद्यार्थ्यांना अदिती खाडिलकर व अंजली ठोकळ यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात. याप्रसंगी मंडळाच्या सचिव चित्रा जोशी, पूनम वानखेडे, अर्चना हिरुगडे,व अर्चना हरळीकर, मधु मगेश व अन्य सदस्य उपस्थित होत्या.