मुरुडमध्ये गुणवंतांचा सत्कार

। मुरुड-जंजिरा । वार्ताहर ।

मुरूड येथील जयश्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे 30व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मुरूड तालुक्यातील दहावी व बारावीत सर्वप्रथम उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा व सदस्यांच्या पाल्यांचा प्रशस्तीपत्रे व रोख रक्कम देऊन श्रीराम पतसंस्थेचे व्हा. चेअरमन मेघराज जाधव व संचालकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या गुणवंतांमध्ये राधिका विरकुड, दक्षता म्हात्रे, अनुज गायकर, स्मरणिका म्हात्रे, अंकुश शेडगे, पुष्कर राठोड, चिन्मय जोशी, निनाद जोशी, प्राजक्ता नाईक, मुग्धा घाग, रुद्राणी जोशी, पारस जोशी, आर्या कोतवाल आदींचा समावेश होता.

30 व्या वार्षिक साधारण सभेत प्रा. एस.बी. वाटाणे यांनी पतसंस्थेच्या सदस्यांची हक्क आणि कर्तव्ये याविषयी माहिती दिली. श्रीराम मूर्तीचे पूजन ज्येष्ठ नागरिक शशिकांत भगत यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविकात प्रा. जाधव यांनी पतसंस्थेकडे भाग भांडवल 3 कोटी रुपये असून, 48 कोटींहून अधिक ठेवी असल्याचे स्पष्ट करत 54.29 लाख नफा प्राप्त केला असे सांगितले. सलग 10 वर्षे 12 टक्के लाभांशांची परंपरा यावर्षीही कायम राखल्याचे नमूद केले.

आर्थिक पत्रकाचे वाचन सिध्देश गद्रे यांनी केले. यावेळी अ‍ॅड. मोहन तांबडकर, अ‍ॅड. संजय जोशी, बाळकृष्ण कासार, सुनील विरकुड, डॉ. संजय पाटील, डॉ. अमित बेनकर, प्रमोद उपाध्ये, समीर उपाध्ये, अशोक दिवेकर, जयश्री जोशी, अश्‍विनी पाटील, अशोक गोखले, सरव्यवस्थापक संजय ठाकूर आदी उपस्थित होते.

Exit mobile version