| वावोशी | प्रतिनिधी |
छावा मराठा सेना महाराष्ट्र राज्य संघटनेच्यावतीने शिक्षक व गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा कार्यक्रमाचे आयोजन वावोशी फाटा येथील जेष्ठ नागरिक सभागृहात करण्यात आले. हा कार्यक्रम शैक्षणिक वर्ष 2025 मध्ये उत्तीर्ण झालेल्या प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा सत्कार आणि त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा राबविण्यात आला. या कार्यक्रमाला छावा मराठा सेना महाराष्ट्र राज्य संघटना संस्थापक अध्यक्ष सुनील भोर, जिल्हाध्यक्ष तानाजी शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष आवटी, अश्विनी ठाकूर, गणेश मोरे, भूषण पाटील, महेश पाटील, भगवान ढेबे, मनीष हातनोलकर, गावित, विद्या घरत, मानसी केदारे, शर्मिला मिसाळ आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्रे देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.







