| नवी दिल्ली | वार्ताहर |
अर्जेंटिना फुटबॉल संघाचा स्टार आणि अनुभवी फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीला ‘लॉरेस स्पोर्ट्स मॅन ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पॅरिसमध्ये सोमवारी झालेल्या समारंभात त्याला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यासोबतच अर्जेंटिना संघाला ‘लॉरेस वर्ल्ड टीम ऑफ द इयर’ घोषित करण्यात आले. यासह मेस्सी हा पहिला खेळाडू बनला आहे, ज्याला एकाच वेळी स्पोर्ट्स मॅन ऑफ द इयर आणि टीम ऑफ द इयर असे दोन्ही पुरस्कार मिळाले आहेत.