नवी मुंबईकरांची मेट्रोला पसंती

महिन्याभरात चार लाख प्रवाशांचा प्रवास

| पनवेल | वार्ताहर |

तीन हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च करून प्रत्यक्षात आलेली नवी मुंबई मेट्रो सुरू होऊन एक महिना पूर्ण झाला आहे. सिडकोच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशा नवी मुंबईतील पहिल्या मेट्रो प्रकल्पाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. एका महिन्यात मेट्रोला एक कोटी 16 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

डिजीटल आरोग्य परिसंस्थेच्या मदतीने मधुमेहाच्या व्यवस्थापनामध्ये घडलेली क्रांती तब्बल 12 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर, अखेर 17 नोव्हेंबर रोजी नवी मुंबईची मेट्रो कोणत्याही औपचारिक उद्घाटनाशिवाय धावू लागली. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिल डिग्गीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मेट्रोचे उद्घाटन झाले. 17 नोव्हेंबरला दुपारी सुरू झालेल्या मेट्रोला प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.

पेणधर ते बेलापूर या 11 किलोमीटर अंतराच्या मार्गावर 11 स्थानकांचा समावेश आहे. दिल्ली आणि मुंबई मेट्रोच्या तिकीट दरांशी तुलना करून, नवी मुंबई मेट्रोचा प्रवास महागडा असल्याचे सांगत हे तिकीट दर कमी करण्याची मागणी काही प्रवाशांनी केली आहे. परंतु पुढे या मागणीत फारसे सातत्य दिसून आले नाही. या 30 दिवसांच्या कालावधीत मेट्रोतून चार लाख 30 प्रवाशांनी प्रवास केला आहे. यातून सिडकोला एक कोटी 16 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. मेट्रोतून दररोज सुमारे साडेबारा हजार प्रवासी धावतात.

सुट्टीदिवशी चांगला प्रतिसाद
सोमवार ते शुक्रवार दररोज प्रवास करणाऱ्या नोकरदारांपेक्षा सुट्टीच्या दिवशी मेट्रोत प्रवाशांची संख्या जास्त असते. अनेक जण कुतूहल म्हणून मेट्रोत फेरफटका मारतात. मेट्रो मार्गावर असलेल्या सेंट्रल पार्कमध्ये सुट्टीदिवशी बच्चेकंपनींसह सहकुटुंब प्रवास करणाऱ्यांमुळे ही संख्या अधिक असल्याचे मेट्रो प्रशासनाचे म्हणणे आहे.
Exit mobile version