तळोज्यात मेट्रो मार्ग उभारणीला सुरुवात

| पनवेल | वार्ताहर |

तळोजा परिसरातील गावालगत कल्याण-तळोजा मेट्रो रेल्वे मार्ग उभारण्याच्या कामाला सुरुवात झाली असून येथे पिलर उभारणीसाठी खोदकाम करण्यात येत आहे. यामुळे तळोजा वसाहतलगत असलेल्या जमिनीच्या किमतीत मागील वर्षीपेक्षा दुप्पटीने वाढ झाली आहे. मेट्रो रेल्वे स्थानकलगत असलेल्या जमिनी मिळविण्यासाठी बांधकाम व्यावसायिक दलालांच्या माध्यमातून प्रयत्न करीत असल्याचे ग्रामस्थांकडून बोलले जात आहे. तसेच, कल्याण-तळोजा मेट्रो मार्गामुळे तळोजा एमआयडीसी, नवी मुंबई आणि पनवेल परिसरात व्यवसाय तसेच नोकरी करणाऱ्या चाकरमान्याचा प्रवास सुखकर आणि कमी वेळेत होणार आहे.

Exit mobile version