हॅशटॅगवर मेट्रो प्रवासाचे फोटो

रिल्स शेअर करण्याबाबतही प्रवाशांचा उत्साह

| नवी मुंबई | प्रतिनिधी |

सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील मार्ग क्र. 1 वर बेलापूर ते पेंधर स्थानकांदरम्यान 17 नोव्हेंबरपासून मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर अवघ्या महिनाभराच्या कालावधीत चार लाख 30 हजार प्रवाशांनी मेट्रोतून प्रवास केला आहे. मेट्रोला नवी मुंबईकरांचा उदंड प्रतिसाद लाभत असून केवळ परिवहनाचे साधन म्हणून नव्हे; तर आपली मेट्रो या भावनेतून नवी मुंबईकरांचे मेट्रोबरोबर एक अनोखे नाते निर्माण झाले आहे. तसेच सिडकोने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत प्रवाशांनी मोठ्या प्रमाणावर सिडकोच्या आणि या हॅशटॅगवर आपल्या मेट्रो प्रवासाची छायाचित्रे, रिल्स आणि अनुभव शेअर केले आहेत.

सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील मार्ग क्र. 1 बेलापूर ते पेंधरपासून मेट्रो सेवा सुरू झाली असून प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद या मार्गावरील मेट्रोला लाभत आहे. या मार्गावर दर दिवशी सरासरी 12 हजार प्रवासी प्रवास करत आहेत. मेट्रो सुरू झाल्यापासून एक महिन्यांच्या कालावधीत चार लाख 30 हजार प्रवाशांनी या मार्गावरून प्रवास केला असून कामकाजाच्या दिवशी नोकरदार वर्ग व सुट्टीच्या दिवशी सिडकोच्या सेंट्रल पार्क उद्यानाला भेट देणारे पर्यटकांचा मेट्रो सेवेला उदंड प्रतिसाद लाभत आहे. मेट्रोच्या रूपाने नवी मुंबईकरांना जलद, आरामदायी आणि सुरक्षित प्रवासाचा सक्षम पर्याय उपलब्ध झाला आहे. यामुळे सर्व वयोगटांतील आणि विविध वर्गांतील प्रवासी मेट्रोने प्रवास करण्याला प्राधान्य देत आहेत.

Exit mobile version